• A
  • A
  • A
मनसेचे अजूनही तळ्यात मळ्यात; आगामी निवडणुकीबाबत निर्णय नाही, राज ठाकरेंची भूमिका

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेससोबत मनसे आघाडी करणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आघाडीच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे. पण, निवडणुकीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसंबंधी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली.


आगामी निवडणुकीत मनसे ३ जागा लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे ३ मतदारसंघ कोणते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आज झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसे नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली. नरेंद्र मोदी यांची लाट असलेल्या मतदारसंघात कोणता उमेदवार देता येईल, याबाबत देखील चाचपणी सुरू असल्याचे समजते.
हेही वाचा - उत्तर मध्य मुंबईची जागा शिवसेनेलाच द्या; युवासेनेची मागणी

पण, या बैठकीतून कोणतीही ठोस भूमिका समोर आली नाही. तसेच, आघाडीबाबत वक्तव्य करण्याचे राज ठाकरे यांनी टाळले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. निर्णय झाल्यास मी स्वतः जाहीर करेल, असे राज ठाकरेंनी म्हटल्याचे समजते. या बैठकीला मनसे नेते संदीप देशपांडे, अनिल शिदोरे, अभिजित पानसे आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES