• A
  • A
  • A
देशात सध्या 'स्टेट टेरिरीजम' पसरत आहे - माजी न्यायमूर्ती एस. एस. पारकर

मुंबई - टाडा, पोटा, मकोकासारखे कायदे एकामागून एक येत आहेत. ज्यामुळे पोलिसांच्या हाती मोठे अधिकार जात असून देशात एक प्रकरे 'स्टेट टेरिरीजम' पसरत असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. एस. पारकर यांनी व्यक्त केले आहे. ते आज मुंबईत बोलत होते.

एस. एस. पारकर, माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय


शाहिद आजमी मेमोरियल लेक्चरतर्फे आज मुंबईतील पत्रकार भवनात देशात विविध राज्यात सुरू असलेल्या चकमकींसंदर्भात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात माजी न्यायमूर्ती एस. एस. पारकर यांनी आपले विचार मांडले.

हेही वाचा - वीजदरवाढीचा भडका; मंगळवारी औद्योगिक संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन
या वेळी पारकर यांनी सांगितले, की न्यायालय पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांवर विश्वास ठेवत नाही. न्यायव्यवस्था तोपर्यंत चांगला निर्णय देऊ शकत नाही, जोपर्यंत वकिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. यामुळे देशातील वकिलांची जबाबदारी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या चर्चासत्रातून देशात सुरू असलेले चकमकींप्रकरणी चर्चा करण्यात आली. यात खास करून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात गेल्या २ वर्षांत एन्काऊंटरच्या ८३८ घटना घडल्या असून ७८ जणांना एन्काऊंटरमध्ये मारल्याचे स्वतः उत्तर प्रदेश सरकार अधिकृतरित्या सांगत आहे. संयुक्त राष्ट्राकडून नुकतीच केंद्र सरकारसोबत याबाबत संपर्क करण्यात आला असून या संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. हे उघड-उघड मानवी हक्कांची पायमल्ली असून या बाबत योग्य पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत यात चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करा, न्यायालयाचा कर्नल पुरोहितांना सल्ला


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES