• A
  • A
  • A
उत्तर मध्य मुंबईची जागा शिवसेनेलाच द्या; युवासेनेची मागणी

मुंबई - एकीकडे शिवसेना भाजपची युती होणार की नाही, याचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यातच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने निवडणूक लढवावी, अशी मागणी युवासनेने केली आहे. युवासेनेच्या वतीने या भागात युवा निर्धार मेळावा घेण्यात आला.


उत्तर मध्य मुंबईत शिवसेनेचे तीन आमदार आहेत. तसेच नगरसेवकांची संख्या देखील इतरांच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकद अधिक आहे. ज्या जागांवर शिवसेनेची ताकद अधिक आहे, तिथे शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी. अन्यथा युती करू नये, असे मत युवासेनेने वरिष्ठ शिवसेना नेत्यांपुढे मांडले आहे.

हेही वाचा - जातीचं नाव काढणाऱ्यांना मी ठोकून काढेन - नितीन गडकरी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमुळे भाजपचा उमेदवार निवडून आला. पण, आता युती झाल्यास शिवसेनेनेच ही जागा लढवावी. भाजपनेही ही जागा शिवसेनेसाठी सोडावी, असे मत उत्तर मध्य मुंबईचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES