• A
  • A
  • A
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करा, न्यायालयाचा कर्नल पुरोहितांना सल्ला

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहितांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. २००८ साली घडवण्यात आलेल्या स्फोटात ७ जणांना आपला प्राण गमावावा लागला होता. याबरोबरच या प्रकरणातील इतर २ आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग व समीर कुलकर्णी यांच्याकडून दाखल केलेल्या याचिकेवर ४ मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे.


२००८ ला मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात UAPA कायदा अंतर्गत खटला हटविण्याची कर्नल पुरोहित यांची याचिका मेंटेनेबल नाही, असे म्हणत पुनर्विचार याचिका दाखल करा, असा मुंबई उच्च न्यायालयाने कर्नल पुरोहितांनी सल्ला दिला आहे. दरम्यान २००८ ला मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी १० वर्षांपूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयानेकडून जामीन मिळाल्यानंतर आपल्याला मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भात दोषमुक्त करावे ही मागणी केली आहे.
यापूर्वी उच्च न्यायालायत कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. मालेगाव स्फोटासंदर्भात कर्नल पुरोहित यांच्याविरोधात खटला चालवण्यास सरकारने दिलेल्या मंजुरीचा निर्णय रद्द करण्यास याअगोदर मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

याप्रकणी एकूण आरोपींपैकी कर्नल पुरोहित यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंग, समीर कुलकर्णी यांच्यावर मोक्का अंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप विशेष न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. दरम्यान 29 सप्टेंबर २००८ ला मालेगाव येथे मुस्लीम बहुल असलेल्या परिसरातील भिक्कु चौक या ठिकाणच्या एका हिरो होंडा मोटार साईकलवर डिटोनेटर बांधून स्फोट घडवण्यात आला होता. ज्यात ७ जणांनी आपला प्राण गमवावा लागला होता. सुरूवातीला हा सिलिंडरचा स्फोट असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलीस तपासात हा बॉम्बस्फोट असल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबई पोलिसांच्या एटीएस पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात याचा तपास झाला होता. ज्यात साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित , माजी मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह इतर आरोपींना अटक झाली होती.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES