• A
  • A
  • A
व्हॅलेंटाईन स्पेशल: प्राण्यांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाईमध्ये टॅटूची क्रेझ

मुंबई - प्रेम व्यक्त करण्यासाठी 'व्हॅलेंटाईन डे'चा दिवस महत्वाचा समजला जातो. म्हणूनच मुक्या प्राण्यांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी मुंबईत अंगावर टॅटू काढण्याचा ट्रेंड आला आहे.


१४ फेब्रुवारीला साजरा केला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची लगबग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सूरू होते. चॉकलेट डे, प्रॉमिस डे असे विविध दिवस आठवडाभर साजरे करण्यात येतात. आपल्या जोडीदाराला भेटवस्तू देण्यासाठी चांगल्या भेटवस्तूचा शोध घेतला जातो. काही जण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पाळीव प्राण्यांबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्राण्यांचे टॅटू अंगावर गोंदवून घेत आहेत.

हेही वाचा - तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने
प्राची आणि प्रतीक महाडीक या नवविवाहित जोडप्याने त्याच्या घरी असलेल्या बनी श्वानावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी हातावर बनीचा टॅटू गोंदवला आहे. घरी असलेला कासवाच्या मृत्यूनंतर त्याची आठवण कायम सोबत राहावी, यासाठी फाल्गुनी पटेलने हातावर कासावाचा टॅटू कोरून घेतला आहे. आकृती सारंगकर हिने आपल्या श्वानाच्या तळ पायाचा पंजा गोंदवला आहे.

हेही वाचा- पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी ‘बॅक रेक स्क्रीन’ बसवणार; बीएमसीचा निर्णय
याबाबत बोलताना प्राची महाडीक यांनी सांगितले, की २०१९ च्या व्हॅलेंटाईनला काही तरी खास करण्याच्या उद्देशाने आम्ही दोघांनी आमच्या डॉगीचे चित्र हातावर काढण्याचे ठरवले आणि तसा टॅटू काढला आहे. माझ्या मित्रांनी मला वाढदिवसाला कासव भेट दिला होता. काही दिवसातच तो आमच्या घरातला भाग झाला होता. मात्र, त्याच्या अचानक जाण्याचे मला दुःख आहे. त्यांची आठवण माझ्या नेहमी सोबत राहावी. त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी मी व्हॅलेंटाईन डे निमित्त हा टॅटू काढला आहे, असे फाल्गुनी हिने सांगितले.

दरवर्षी नवीन ट्रेंड सुरू असतो. या वर्षी मी टॅटूच्या मागणीमध्ये बदल पाहत आहे. लोक नवीन डिझाईन घेऊन येतात. त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्याबद्दल असलेली प्रेमाची भावना व्यक्त टॅटूच्या माध्यमातून व्यक्त करत आहे, असे एलियन टॅटूचे मालक भानुशाली यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES