• A
  • A
  • A
पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी ‘बॅक रेक स्क्रीन’ बसवणार; बीएमसीचा निर्णय

मुंबई - थोडा जरी पाऊस पडला तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने अनेक ठिकाणी पम्पिंग स्टेशनही बांधले. मात्र, त्यात शहराच्या विविध भागातून टाकण्यात आलेला कचरा जमा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी पालिकेने पम्पिंग स्टेशनमध्ये ‘बॅक रेक स्क्रीन’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.


‘बॅक रेक स्क्रीन’ बसवल्यानंतर पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा या ठिकाणी अडकला जाणार असून पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत होणार आहे. पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी (बीएमसी) मुंबई महापालिकेने विविध ठिकाणी पम्पिंग स्टेशन बांधली आहे. विशेषत: २००५ च्या अतिवृष्टीनंतर महापालिकेने ब्रिमस्टोवड अंतर्गत आठ पंम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- महापालिका व वृक्ष प्राधिकरण आयोजित फळ, फुले भाजी प्रदर्शनाला मुलुंडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या पार्श्वभूमीवर गेल्या १३ वर्षांत पालिकेने आतापर्यंत इर्ला, हाजी अली, वरळी येथे क्लिव्हलँड आणि लव्हग्रोव्ह, रे रोडला ब्रिटानिया आऊटफॉल ही ५ पम्पिंग स्टेशन्स सुरू करण्यात आले. मात्र पम्पिंग स्टेशन्स उभारून देखील अनेक भागात अतिवृष्टीत पाणी साठल्याने नागरिकांची गैरसोय होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर प्लास्टिकचा कचरा, थर्माकोल, पाण्याच्या बाटल्या असा अनेक प्रकारचा कचरा जलवाहिन्यांमध्ये अडकून स्टेशनमधून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा- मुंबईत दुर्मिळ वाहनांचे प्रदर्शन, बघण्यासाठी नागरिकांची गर्दी
या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी ‘बॅक रेक स्क्रीन’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इर्ला नाल्यावरही स्क्रीन बसवण्याचे महापालिकेकडून आदेश देण्यात आले आहेत. लव्हग्रोव्हसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पालिका अर्थसंकल्पात ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गझदरबंद स्टेशनचे काम मे २०१९ पर्यंत पूर्ण होणार असून मोगरा स्टेशनसाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचीही माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES