• A
  • A
  • A
देशी,विदेशी रंगीबेरंगी फुलांसोबत मुलुंडकरांनी घेतल्या सेल्फी

मुंबई - मुलुंड पूर्वेच्या महानगर पालिकेच्या चिंतामणी देशमुख उद्यानात मुंबई महानगर पालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे 'झाडे, फुले, फळे ,भाजी प्रदर्शन' भरवण्यात आले. प्रदर्शनातील दुर्मिळ वृक्ष, फुले, भाज्या पाहून मुलुंडकर उत्साहित झाले आहेत.हेही वाचा - पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांची राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद
या प्रदर्शनात वेगवेगळी देशी-विदेशी फुले बहरली आहेत. फुले वेलींची गुंफण केल्याने प्रदर्शनाचे सौंदर्य अधिक खुलले आहे. लहान मुले, महिलांना फुलांसोबत फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. वृक्ष प्रेमी २ दिवसांपासून येथील फुलांची आणि भाज्यांची माहिती घेत आहेत. या प्रदर्शनातील दुर्मिळ भाज्या आकर्षण ठरत आहेत.


हेही वाचा- मुंबईत दुर्मिळ वाहनांचे प्रदर्शन, बघण्यासाठी नागरिकांची गर्दी
महात्मा गांधी यांच्या १५० व्या पुण्यतिथीनिमित्त फुले आणि वेगवेगळ्या रंगांच्या फुलांपासून गांधीजींचा आकर्षक चष्मा तयार करण्यात आला आहे. गांधीजींची समाधीस्थळ रेखाटून त्यावर 'हे राम' असा उल्लेख व 'खेड्याकडे चला' हा संदेश देण्याला आहे. आयोजकांनी गांधीजींच्या रंगोळीतून निसर्ग संदेश दिला आहे.विदेशी भाज्यांची माहितीही येथे देण्यात येते. ग्रामीण भागातील भाज्यांची माहिती शहरी भागातील लोकांना व्हावी, हा आयोजनकर्त्यांचा उद्देश आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES