• A
  • A
  • A
पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांची राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद

मुंबई - संकटात सापडलेल्या पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर येथे १३ फेब्रुवारीला राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व राज्य पदाधिकारी उदय नारकर यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या या परिषदेसाठी राज्यभरातून हजारो पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.


अहमदनगर येथील सैनिक कल्याण समिती लॉन्स येथे सकाळी ११ वाजता ही परिषद संपन्न होत आहे. उद्योग तोट्यात गेल्याने बँका उद्योगांना कर्जात सूट देतात. त्याच धर्तीवर पॉलिहाऊस शेडनेट धारकांना कर्जात सूट मिळणे अपेक्षित आहे. परिषदेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय यादी बनवून त्यांच्यावतीने न्यायालयात दाद मागण्यांबाबत कार्यवाही केली जाणार आहे. संकटग्रस्त पॉलिहाऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांनी यासाठी आपला सातबारा उतारा, बँकेचे कर्ज स्टेटमेंट सोबत घेऊन यावे, असे आवाहनही समन्वय समितीने केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचे अर्जही यावेळी भरून घेतले जाणार आहेत.
हेही वाचा- ईव्हीएम आणि फसफसणारा आत्मविश्वास असताना अमेरिकेतही 'कमळ' फुलेल, सेनेचा भाजपवर वार

पॉलिहॉऊस शेटनेटधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समन्वय समितीच्या पुढाकाराने कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीत कर्जबाजारी शेडनेट पॉलिहाऊस धारकांच्या याद्या व माहिती कृषि विभागाच्या माध्यमातून गोळा करण्याबाबत निर्णय झाला आहे. कृषि राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. परिषदेत या निर्णयांची माहिती देऊन आगामी कार्यवाहीचे नियोजन करण्यात येणार आहे.
हेही वाचा- शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय व्यसन, सलाम बाँम्बे संस्थेचा दावा
पॉलिहॉऊस शेटनेटधारक शेतकऱ्यांनी या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र पॉलिहॉऊस शेटनेटधारक शेतकरी समन्वयक समितीचे बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, अरविंद देसाई, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळे, दिलीप डेंगळे, किरण अरगडे, महेश शेटे, सुजाता थेटे, मनोज आहेर, अण्णा सुंब, शिवाजी तळेकर, अनिरुध्द रेडेकर, शिवाजी नाईक, संजय तळेकर, नामदेव जाधव, विकास वाघ, भालचंद्र दौंडकर, वासुदेव चौधरी आदींनी केले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES