• A
  • A
  • A
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय व्यसन, सलाम बाँम्बे संस्थेचा दावा

मुंबई - सलाम बाँम्बे फाऊंडेशन या संस्थेने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात संस्थेने मुंबईतील महापालिका शाळांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले आहे. व्यसन करण्यासाठी मुले हे निकोटीन असलेल्या ई-सिगारेटचा आणि त्यासोबत धुम्रपानाचा वापर करत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र


विविध प्रकारच्या सरकारी, खासगी अनुदानाचा लाभ घेत सरकारच्या बाजूने अहवाल तयार करून देणाऱ्या संस्थांची चलती असतानाच या अहवालातून बाहेर आलेली माहिती धक्कादायक आहे. मोबाईल आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे मुले ई-सिगारेटची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने करत असल्याचा दावाही संस्थेने केला आहे. सलाम बॉम्बेने मागील वर्षी मुंबई शहर आणि उपनगरातील ४० शाळांमध्ये जाऊन हे सर्वेक्षण केले असून त्यातील बहुतांश आकडेवारी ही मागील वर्षातील असल्याचे नमूद केले आहे. या सर्वेक्षणमध्ये ४ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी सलाम बॉम्बेच्या व्यक्तीशी संवाद साधला. त्यामधून १७५ विद्यार्थ्यांनी आपण ई - सिगारेट नशेसाठी वापरत असल्याचे मान्य केले असल्याचा दावा संस्थेने केला आहे.

वाचा- गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामी
विद्यार्थ्यांना विचारण्यात आले की, हे तुम्ही कुठून आणि किती रुपयाला विकत घेतले. त्यावेळी ऑनलाईन पध्दतीने ३०० रुपयात मागविली असल्याची कबुली मुलांनी दिली असल्याचा दावा संस्थेने केला आहे. आम्ही शाळांमध्ये व्यसनमुक्तीचे उपक्रम सुरु केले असून व्यसनात अडकलेल्या विद्यार्थ्यांना यातून लवकरच बाहेर काढण्यासाठी फायदा होत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरु करण्यात आले असून याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
वाचा- 'हा तर मोदींचा नवा भारत', अमोल पालेकर प्रकरणावरून सिब्बलांचा सरकारवर निशाणा
दरम्यान, संस्थेने राज्यातील शिक्षकांचा, शिक्षक संघटनांचा ज्यांच्या विरोधात सर्वाधिक रोष व्यक्त केला जात आहे, त्या शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज 'बेस्ट सर्पोटिव्ह पॉलिटिकल लीडर' म्हणून एका कार्यक्रमात सत्कार केला. तावडे यांच्या या सत्कारामुळे शिक्षकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर दुसरीकडे असरप्रमाणेच हाही अहवाल ठरवून केला असल्याच्या प्रतिक्रियाही शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES