• A
  • A
  • A
मुंबईत दुर्मिळ वाहनांचे प्रदर्शन, बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

मुंबई - शहरातील बांद्रा येथील एमएमआरडीए मैदानावर दुर्मिळ बाईक आणि २ दिवसीय वाहनांचे प्रदर्शन भरवण्यात आले. आज या दुर्मिळ वाहनांची बांद्रा ते बेलार्ड पिअर पर्यंत रॅली काढण्यात आली. दुर्मिळ वाहने बघण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.


वृद्धापासून ते लहानग्यापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांची संख्या बघ्यांमध्ये दिसून येत होती. जुन्या काळातील ही वाहने एकत्र पाहण्याची संधी कधीतरी मिळते. या रॅलीमध्ये जवळपास २०० वाहने सहभागी झाली होती. ऑडी, मर्सिडीज, मॅसरेटी, लॅम्बोर्गिनी, अस्टन मार्टन, पोर्श, फेरारी, बेंटले आणि रोल्स रॉइस अशा प्रसिद्ध सुपर आणि लक्झरी कार, बुलेट, जावा, स्पोर्ट्स बाईक आदी गाड्यांचा या रॅलीमध्ये सहभागी होता. प्रखर उन असतानाही नागरिक उत्साहाने ही वाहनांती रॅली बघत होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा - मुंबईच्या रस्त्यावर धावली दुसऱ्या महायुद्धातील दुर्मिळ जीप
एमएमआरडीए मैदानातून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर बीकेसी सी लिंक - वरळी सीफेस - एनएससीआय - हाजी अली - बाबूलनाथ चौपाटी, मरीन ड्राइव्ह ते रिझर्व्ह बँक या रस्त्यावर जात बलार्ड इस्टेट येथे रॅलीची समाप्ती करण्यात आली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES