• A
  • A
  • A
पंडित नेहरू कॅम्ब्रिज विद्यापीठात नापास झाले होते; मुंबईत सुब्रमण्यम स्वामींचे वक्तव्य

मुंबई - पंडित नेहरू कॅम्ब्रिज विद्यापीठात नापास झाले होते. तसेच संपूर्ण गांधी आणि नेहरू घराण्यात कोणीच पदवीधर नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित 'आधुनिक भारताची परिकल्पना: भविष्याचे मार्ग' या कार्यक्रमात ते बोलत होते.

सुब्रमण्यम स्वामी व्याख्यानमालेत


हेही वाचा - CRPF जवानांच्या मेजवानीत ग्रेनेड हल्ला, ४ पोलीस व नागरिक गंभीर जखमी
संपूर्ण गांधी आणि नेहरू घराण्यात कोणीच पदवीधर नाही, असेही स्वामी यावेळी बरळले. भारतीय संस्कृती सर्वात जूनी असून ब्रिटिशांनी भारताला तोडण्याचा प्रयत्न केला होता, अनुसूचित जाती आणि ब्राम्हण एकच आहे. भारतातील मुस्लीम लोक हे मुळचे हिंदूच आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

भारत विकास परिषद, चेंबूरच्यावतिने हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम ६ वाजता सुरू होणार होता. मात्र, स्वामी उशीरा पोहोचल्याने ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. येता क्षणीच त्यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. पाकिस्तान संपल्याशिवाय आधुनिक भारताची निर्मिती होणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. काश्मीर आणि पाकिस्तानच्या समस्येवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. काश्मीर समस्येवर निदान मिळवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. २०२० ते ३० पर्यंत पाकिस्तनाचे ४ तुकडे होतील, असेही ते म्हणाले.


हेही वाचा - 'मोदींशी निष्ठा दाखवणाऱ्यांवर आमची विशेष नजर', सरकारी अधिकाऱ्यांना काँग्रेसची धमकी?
रामजन्म भूमी माझे अस्तीत्व आणि अस्मिता आहे. मंदिर तोडूनच मशिद उभारण्यात आली. तसे सिद्धही झाले आहे. बाबरी हे ७ वर्षाच्या मुलाचे नाव होते. बाबराने देशातील अनेक मंदिरे तोडली होती, असे अनेक दावे सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी बोलताना केले. राम मंदिर उभारण्यासाठी भारत सरकारने न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहू नये, असेही ते म्हणाले.

डॉ. स्वामी यावेळी म्हणाले, की या देशात संस्कृत आणि देवनागरी लिपी अनिवार्य केली पाहिजे. प्रत्येक भाषेत संस्कृत शब्द आहेत. शाळांमध्ये देशाच्या अभिमानास्पद इतिहास व संस्कृती ऐवजी मुघल आणि इंग्रजांचे उदात्तीकरण शिकवले जाते. त्यामुळे अशी पुस्तके लवकरात लवकर बदलली पाहिजेत असा युक्तीवादही त्यांनी यावेळी केला.


हेही वाचा - पदभार सांभाळल्यानंतर प्रियांका गांधींचा पहिलाच 'यूपी' दौरा; 'ही' आहे रणनीती


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES