• A
  • A
  • A
परभणी लोकसभेची लढत चौरंगी; वंचित आघाडीकडून आलमगीर खान यांच्या नावाची घोषणा

परभणी - लोकसभेची लढत आता चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. हा मतदारसंघ गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यांना हादरा देण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, यावेळी वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी आलमगीर खान यांच्या उमेदवारीची घोषणा केली.


भाजपच्या युवा कार्यकर्त्या मेघना बोर्डीकर यांनी अद्यापही माघार घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासह चार तगडे उमेदवार रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षात परभणीत सत्तेत राहणाऱ्या शिवसेनेच्या या एकमेव उमेदवाराला दुबार उभे राहण्याची संधी मिळाली आहे. आणि त्याहून वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सेनेचा एकही खासदार शिवसेनेत राहिला नाही, प्रत्येकाने खासदारकीचा कार्यकाळ संपताच इतर पक्षात प्रवेश केला. यात सेनेचे पाहिले खासदार दिवंगत प्रा. अशोकराव देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे आणि ऍड. गणेशराव दुधगावकर यांचा समावेश आहे.
हेही वाचा-परभणी लोकसभेत शिवसेना-राष्ट्रवादीत थेट लढत, मात्र बंडखोरही 'जोरात'

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत विजयी झालेले खासदार संजय जाधव हे मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे प्रचंड विरोधानंतर देखील पक्षाने त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ केली आहे. त्यांना विरोध होत असला तरी सेनेकडून अन्य कुठलाही उमेदवार पुढे आलेला नाही. त्यामुळे पक्षाला देखील त्यांच्याच नावाचा विचार करावा लागल्याची स्थिती आहे. जाधव हे आक्रमक आणि शिवसेना कट्टर म्हणून सर्वपरिचित आहेत. ते मूळचे परभणीतील नाहीत, त्यांच्या काळात कुठलाही विकास झाला नसल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जातो.
या उलट खासदार जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला उमेदवार अत्यंत मवाळ आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर माजी आमदार उत्तमराव विटेकर यांचे चिरंजीव आहेत. जिल्ह्यात त्यांचा मोठा गोतावळा आहे. शांत आणि संयमी स्वभावाचे विटेकर आक्रमक जाधवांचा सामना कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपकडून इच्छुक असलेल्या पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी युतीनंतर त्यांच्या इच्छेला 'ब्रेक' दिला आहे. तर दुसरीकडे भाजपकडूनच इच्छुक असलेल्या मेघना बोर्डीकर मात्र, मतदार संघात जोरदार सक्रीय झाल्या आहेत. त्या बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने त्या माघारी फिरणार नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मात्र शिवसेनेचे खासदार जाधव यांची डोकेदुखी वाढणार आहे. शिवाय त्यांचा आणि राजेश विटेकरांचे गोतावळा एकच असल्याने त्यांनाही बोर्डीकरांचा थोड्या प्रमाणात फटका बसणार आहे.
बहुप्रतिक्षित वंचित बहुजन आघाडीने अखेर त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली. १६ मार्चला परभणीत जोरदार सभा घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी प्रचंड हवा निर्माण केली होती. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी 'ई टीव्ही'ने वर्तवलेल्या शक्यतेनुसार वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम समाजातील उमेदवार दिला आहे. आलमगीर खान यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. ते परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तथा जालना जिल्ह्यातील परतूर येथील मूळचे रहिवासी आहेत.

तसेच ते एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या जवळचे आहेत. त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष पद आहे. त्यांचे वास्तव्य हैदराबाद येथे असून त्यांचा सॉफ्टवेअर संबंधित व्यवसाय आहे. सुशिक्षित आणि मुस्लीम चेहरा देण्याचा प्रयत्न वंचित आघाडीने केला आहे. त्याचा फटका मात्र राजेश विटेकरांना बसणार आहे. शिवाय ते स्वतः कितपत यशस्वी ठरतात, हे येणाऱ्या काळात कळणार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मात्र, परभणीची निवडणूक चौरंगी झाली आहे, हे निश्चित.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES