• A
  • A
  • A
सामूहिक कॉपी चालणाऱ्या शाळेतील ११ शिक्षकांवर कारवाई ; परभणी झेडपी सीईओंचा दणका

परभणी - जिल्हा परिषदेचे सीईओ पृथ्वीराज बी. पी. यांनी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयात धडक कारवाई केली. १० वीच्या परीक्षेदरम्यान होत असलेल्या सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकारास जबाबदार असलेल्या केंद्रसंचालकासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओंनी दिले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.


सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान बुधवारी भूमितीचा पेपर होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या नेतृत्वात भरारी आणि बैठ्या पथकाने एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. परीक्षा सुरू असताना सीईओ बी. पी. पृथ्वीराज यांच्यासह पथकातील गटविकास अधिकारी एस. आर.कांबळे, औरंगाबाद विभागाचे अधीक्षक ए.बी.जाधव, पर्यवेक्षक के.एम.अंबुलगेकर, एस. डी. ससाणे यांचे भरारी पथक आणि बैठे पथकातील ज्योती गऊळकर, बी.एल.रब्बेवार, जी.डी गायकवाड, एस.के.बंडेवाड परीक्षा केंद्रात पोहोचले.

हेही वाचा - परभणी लोकसभा मतदार संघात ५४ केंद्रे संवेदनशील; दिव्यांगांसाठी खास व्यवस्था
या ठिकाणी काही अनाधिकृत शिक्षक, वसतिगृह कर्मचारी यांच्या माध्यमातून परीक्षेदरम्यान अनियमितता व गैरप्रकार होत असल्याचे पथकास आढळून आले. काही कर्मचारी विद्यालयाच्या वरच्या मजल्यावर एक रूम बंद करून बाहेर पहारा देत असल्याचेही सापडले. या रूममध्ये गैरप्रकार होत असल्याचे तपासणीत समोर आले. हा प्रकार सीईओ बी. पी. पृथ्वीराज आणि त्यांचा पथकास धक्का देणारा ठरला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली.

हेही वाचा - वेशांतरीत परभणी पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा, ६ जण ताब्यात
यात केंद्र संचालक प्रदीप जाधव यांच्यासह बालाजी बनसोडे, प्रभू भुसारे, शेषराव भुसारे, अनंता भुसारे, विरेंद्र भुसारे, शंकर पवार, मारोती भुसारे, विठ्ठल भालेराव, धम्मपाल रणवीर आणि संतोष मोरतळे हे दहा व्यक्ती गैरप्रकार आणि अनियमिततेसाठी सहकार्य करत आसल्याचे आढळून आले. यानंतर या सर्व व्यक्तींवर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ, अन्य विनिर्दिष्टीत परीक्षेतील गैरप्रकार प्रतिबंधित अधिनियम १९८२ कलम ७, अन्य प्रचिलित कायदे शासन निर्णय, शासकीय धोरण, भारतीय दंड विधाना नुसार कारवाई करण्याच्या सूचना सीईओ पृथ्वीराज यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या. संध्याकाळपर्यंत एफआयआरची कॉपी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे परीक्षा सुरळीत चालत असल्याचे सांगण्यात येत असताना स्वतः सीईओनींच परीक्षेदरम्यान चालणारा गैरप्रकार उघडकीस आणल्याने शिक्षण विभागाचा बुरखा फाटल्याची चर्चा आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES