• A
  • A
  • A
परभणीतील एसबीआयच्या विमा कार्यालयात शेतकऱ्यांचे भजन आंदोलन

परभणी - मानवत तालुक्यातील सात गावांमधील शेतकऱ्यांच्या पीक विम्यातून तब्बल तीन कोटींहून अधिक रुपयांचे विमा हप्ते परस्पर कपात केल्याचा आरोप स्टेट बँक ऑफ इंडियावर होत आहे. या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी ३ दिवसांपासून मानवतच्या शाखेसमोर 'मुक्काम ठोको' आंदोलन केले, परंतु याप्रकरणी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी दाद देऊ शकते, असे समजल्यानंतर शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) परभणीतील एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात धरणे देऊन भजन आंदोलन सुरू केले.


हेही वाचा - परभणीत दहावीच्या परीक्षेत ५ कॉपीबहाद्दरांवर भरारी पथकांची कारवाई
मानवत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या परस्पर त्यांच्या २०१७ मधील पीक कर्जातून प्रति लाखास २० हजार रुपयांची पॉलिसी काढून घेतली. बँकेस दत्तक असलेल्या ७ गावातील शेतकऱ्यांचे ३ कोटी रुपयांचा हप्ता वसूल केला. त्यावेळी कर्ज हवे, म्हणून यास कोणीही विरोध केला नाही. मात्र, त्यानंतर शासनाने पीक कर्ज देणेच बंद केले. तसेच दुष्काळामुळे शेतात काही पिकले नाही. म्हणून हा हप्ता यापुढे शेतकऱ्यांना भरणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी या पॉलिसी रद्द कराव्यात, या मागणीसाठी ३ दिवसांपासून मानवतच्या बँकेत मुक्काम ठोको आंदोलन केले. परंतु, याप्रकरणी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी निर्णय घेऊ शकते, असे समजल्यानंतर शेतकऱ्यांनी शुक्रवारी परभणीतील इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात ठिय्या मांडून भजन कीर्तन आंदोलन सुरू केले आहे.
या प्रकरणी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. हे प्रकरण आपण वरिष्ठांकडे पाठवले आहे, यावर तेच निर्णय घेऊ शकतील, असे सांगितले. तर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी आरोप केला की, बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे.
हेही वाचा - परभणीत ८२८ दिव्यांगांना उपयुक्त साहित्याचे वाटप

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES