• A
  • A
  • A
परभणीत दहावीच्या परीक्षेत ५ कॉपीबहाद्दरांवर भरारी पथकांची कारवाई

परभणी - दहावी बोर्डाच्या परीक्षेत मंगळवारी इंग्रजी विषयाच्या पेपरला भरारी पथकांकडून ५ कॉपी बहाद्दरांना पकडून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील ९४ केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू असून कॉपी बहाद्दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३३ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. २९ हजार १०९ विद्यार्थ्यांनी यासाठी परीक्षा फॉर्म भरले आहेत. त्यापैकी आज मंगळवारी इंग्रजी विषयाच्या पेपरला प्रत्यक्षात २८ हजार ४६३ विद्यार्थी हजर होते. ९४० विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला नाही. आज इंग्रजीचा पेपर असल्याने शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली होती. सर्व परिक्षा केंद्राना सीसीटीव्हीच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे, तर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी ९४ बैठे तर ३३ भरारी पथकांची नेमणूक केली आहे.

केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज मंगळवारी भरारी पथकाने परभणी तालुक्यातील संबरमध्ये नव्याने देण्यात आलेल्या गुरू आनंद भरती माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर अचानक तपासणी करून ४ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडले. तसेच जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील संत जनार्दन विद्यालयात एका कॉपी बहाद्दर विद्यार्थ्याला पकडण्यात आले. या ५ विद्यार्थ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES