• A
  • A
  • A
परभणीत ८२८ दिव्यांगांना उपयुक्त साहित्याचे वाटप

परभणी - वसमत रोडवर आयोजित दिव्यांगांसाठीच्या मोफत साहित्य वाटप शिबिरात ८२८ जणांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते.


महाराज म्हणाले, आपले जीवन समाज उपयोगी असावे. माणसाने देवळात जावून दान धर्म करण्यापेक्षा दिव्यांगांची मदत करावी. दिव्यांगांना पाय देवून खरा परमार्थ साधता येतो. मंदिरे बांधण्यापेक्षा या दिव्यांगांची सेवा ही खरी ईश्वर सेवा आहे.
हेही वाचा - अयोध्येचं राम मंदिर कधी होईल माहित नाही, पण पाथरीत इतिहास घडला - हरीष चैतन्यानंद सरस्वती
परभणी महानगर भाजप व भारतीय साधारण बीमा निगम सी. एस. आर. प्रकल्पांतर्गत भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगासाठी मोफत साहित्य वाटप शिबीर १ ते ६ मार्च या कालावधीमध्ये होत आहे. व्यासपीठावर नामवंत डॉ. नारायण व्यास, त्यांचे सहकारी, आरोग्य दूत ज्ञानेश्वर वाघमारे भाजप संघटन सरचिटणीस संजय शेळके, मोहन कुलकर्णी, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे, प्रशांत सांगळे, रितेश जैन, अतिक पटेल, अरुण कदम, भागवत पाटील, बाळू कदम होते.

हेही वाचा - ५० हजार डबल मतदारांची चौकशी सुरू - जिल्हाधिकारी
या संपूर्ण शिबिरात ७५ लक्ष रुपयांचे साहित्य दिव्यांगांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. १ मार्च रोजी जवळपास ११५७ दिव्यागांची प्राथमिक कान तपासणी, पायानी विकलांग असलेल्या रुग्णांची पाय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्यानुसार, ८२८ गरजू दिव्यागांना जयपुर फुट, कँलिपर्स, कुबड्या, तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, काठी, वॉकर तसेच विकलांगांसाठीचे इतर साहित्य मोफत वाटप करण्यात आले. तसेच पायाने दिव्यांगांसाठी जयपूर येथील प्रसिद्ध कारागीर यांनी दिव्यांगांच्या पायाची तपासणी करून लगेच त्या आकाराचा पाय तयार करून दिला. शिबिरासाठी बाजार समिती संचालक रामभाऊ आरगडे, सरपंच अंकुश आवरगंड, एन. डी. देशमुख, सरपंच गुलाब पंढरकर, सरपंच अशोक जोंधळे, सरपंच संदिप जाधव आदींनी परिश्रम घेतले.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES