• A
  • A
  • A
५० हजार डबल मतदारांची चौकशी सुरू - जिल्हाधिकारी

परभणी - जिल्ह्यात दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांची संख्या ५० हजारच्या जवळपास असल्याची तक्रार असून त्यांची चौकशी सुरू झाली आहे. पुन्हा पडताळणी करून कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली आहे. मतदान जागृतीसाठी १८ डिसेंबरपासून आजपर्यंत जिल्ह्यात प्रत्यक्ष ८९ हजार ४८६ मतदारांनी मतदान करून पाहिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.


हेही वाचा - ठाण्यात महिला शेतकरी आठवडा बाजाराची सुरुवात; २ तासात ५०० किलो भाज्यांची विक्री
परभणी जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत तब्बल ५० हजार लोकांनी मतदान यादीत डबल नावे टाकल्याचा आरोप परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लेखी तक्रार करत चौकशीची मागणी त्यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्याने सर्व राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - एजन्सी कार्यालय फोडून १० लाखांची सिगारेट पाकिटे लंपास
मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून, यासंदर्भात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी शिवाशंकर बोलत होते. पुढे ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व मतदान केंद्रांवर बि. एल. ओ. हजर राहणार आहेत. जिल्ह्यात ५४ हजार ६५९ मतदान वाढले असून अपंग मतदारांची नोंदणी ९४२ वरुन २ हजार ९५० वर गेली आहे. मृत, स्थलांतरीत, दुबार, डी.एस.ई. आदी ९ हजार ७१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. स्त्री-पुरुष प्रमाण २ ने वाढले आहे. अपंग मतदारांची नोंदणी ९४२ वरुन २ हजार ९५० वर गेली आहे. मतदारांचे लोकसंख्येशी प्रमाण ६९.७२ टक्के आहे. झोनल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल आहे. लोकसभेसाठी प्रथमच व्ही.व्ही. पॅडचा वापर करण्यात येणार आहे. मतदान जागृतीसाठी १८ डिसेंबरपासून कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यात प्रत्यक्ष ८९ हजार ४८६ मतदारांनी मतदान करुन पाहिले आहे. आत्तापर्यंत २२ हजार नावे कमी करण्यात आली असल्याची माहितीसुद्धा यावेळी त्यांनी दिली. पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES