• A
  • A
  • A
अयोध्येचं राम मंदिर कधी होईल माहित नाही, पण पाथरीत इतिहास घडला - हरीष चैतन्यानंद सरस्वती

परभणी - जी माणसे विचारी असतात तीच समाजाच्या उपयोगी पडतात. अयोध्येच्या मंदिराचा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे. ते कधी होईल माहीत नाही, पण पाथरीत मात्र आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी जुन्या श्रीराम मंदिराचा जिर्णोध्दार करून इतिहास घडवला, असे प्रतिपादन स्वामी हरीष चैतन्यानंद सरस्वती महाराज यांनी केले.


पाथरी शहरातील जुन्या श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी भुमीपूजनानंतर झालेल्या प्रवचनात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्रानी हे होते तर प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर होते.
हेही वाचा - पाच गावांना कॅनॉलचे पाणीच पोहोचेना; 'राष्ट्रवादी'कडून जलसमाधी आंदोलनाचा इशारा
यावेळी बोलताना महाराज म्हणाले, चारित्र्यवान माणूसच भगवान बनत असतो. प्रत्येक व्यक्तिच्या अंगात समन्वयाचा दृष्टीकोण असला पाहीजे. त्याची श्रेणी ही त्याच्या व्यक्तीमत्वावर अवलंबुन असते. मनातील दुर्गुन बाजुला सारा, मानवता हाच धर्म आहे. जाती-पाती ह्या आपणच निर्माण केल्या आहेत. उचनीच मानव जातीच मानते. प्राण्यांमध्ये जीवन जगण्यासाठी असा प्रकार दिसून येत नाही. इथे मात्र एखादे काम करावयाचे झाले तर माणसांना समजावून सांगितले जाते. सर्व प्राण्यात माणसालाच बुद्धी दिली. तरीही कलह, द्वेष भावना ठेवली जाते. समन्वय, एकता हीच सर्व धर्माची शिकवण असून आज आमदार दुर्रानीमुळे हा प्रसंग सर्वांनी अनुभवला. हा इतिहास घडला, असे ते म्हणाले.
हेही वाचा - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बहुउपयोगी कृषी अवजारांचे प्रदर्शन
सर्वसमावेशक कामे करण्याचा प्रयत्न - आमदार दुर्रानी
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले, की आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा सुरूवातीपासून प्रयत्न करतो. शहरातील १७ मंदिरांना सभामंडप दिले आहेत. हे श्रीराम मंदिर पुरातन असून आम्ही शाळेत जाताना उशीर झाल्यास येथे लपून बसायचो. मात्र, हे श्रीरामाचे मंदिर आहे हे माहित नव्हते. हे पुरात असलेले मंदिर पुर्णत: जिर्ण झाले होते. त्याचे केवळ अवशेष शिल्लक होते. याचा पुर्ण जिर्णोद्धार आता होणार आहे. चुकून आणखी एखादे धार्मिक स्थळ राहीले असल्यास सांगावे, असे आवाहन त्यांनी शहरवासीयांना केले.
हेही वाचा - वाळूअभावी घरकूल लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर; पाथरीत तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
या कार्यक्रमास जेष्ठ नेते मुंजाजी भाले पाटील, गंगाधरराव गायकवाड, नगराध्यक्षा मिना भोरे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्रानी, भावना नखाते, मिरा टेंगसे, दादासाहेब टेंगसे, डॉ.जगदीश शिंदे, सुभाष आबा कोल्हे, चक्रधरराव उगले, अशोक गिराम, महादेवराव जोगदंड, मनुगुरू कानशुक्ले, तारेख खान दुर्रानी, अॅड कालिदास चौधरी, पालिका गटनेते जुनेदखान दुर्रानी, सभापती शिवकन्या ढगे, तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, कल्याण चौधरी, नगरसेवक मंगल पाटील, अर्पिता चौधरी, महादेव खारकर, गुंफा भाले, गजानन उंबरकर, प्रशांत चिद्रवार, विष्णू ढेरे, संजय हराळे, अरुन जोशी, पांडूरंग क्षिरसागर, पिंटू चिकने, प्रविण पाठक, अजय वांगिकर उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES