• A
  • A
  • A
परभणी जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; ९१ केंद्रांची निर्मिती

परभणी - जिल्ह्यातील ३० हजार २६१ विद्यार्थी आजपासून दहावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी एकूण ९१ केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तैनात राहणार आहे. तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, वादग्रस्त केंद्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. २९ हजार २६ नवीन विद्यार्थ्यांनी यासाठी परीक्षा फॉर्म भरले आहेत, तर १ हजार २३५ विद्यार्थी पुर्नपरीक्षार्थी आहेत, असे ३० हजार २६१ विद्यार्थी ९१ केंद्रावर परीक्षा देणार आहेत. सर्व केंद्राना सीसीटीव्हीच्या निगराणीत परीक्षा घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - खोडद येथील दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात
औरंगाबाद विभागाच्यावतीने औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या ५ जिल्ह्यातून परीक्षेसाठी १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले आहेत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली असून एका वर्गात २५ विद्यार्थ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या शिक्षण मंडळाच्यावतीने १२ वीची परीक्षा घेण्यात येत आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी शिक्षण विभागाला आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.
हेही वाचा - सैन्यासाठी बनविले 'रक्तदान अॅप'; वाशिममधील तरुणांचा उपक्रम
जिल्ह्यातील बारावी परीक्षेला पहिल्याच दिवशी ऐनवेळी काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून ग्रामीण भागात देण्यात आले होते. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. अनेक परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकार सुरू असल्याची तक्रार खुद्द पर्यवेक्षकांनी केली असल्याने काही केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीच्या परीक्षेत असे काही प्रकार होवू नयेत यासाठी महसूल आणि शिक्षण विभाग खबरदारी घेत आहे. बारावी परीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा कशी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES