• A
  • A
  • A
परभणीत दिव्यांगांच्या शिबिरात दोन हजार पाचशे रुग्णांची तपासणी

परभणी - जिंतूर रोडवरील नूतन विद्यालयाच्या प्रांगणावर सोमवारी पार पडलेल्या खास दिव्यांगांच्या शिबिरात तब्बल २ हजार ५०० दिव्यांग रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या शिबिरात रुग्णांची तपासणी होऊन दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी त्यांच्या अवयवांचे मोजमाप घेण्यात आले.


भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (कानपूर), जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र (हिंगोली) व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरस्थळी रुग्णांसाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष उभारण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शांतादेवी वेदप्रकाश पाटील वैद्यकीय महाविद्यालय हट्टा येथील वैद्यकीय अधिकाऱयांनी रुग्ण नोंदणी करून घेतली. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा- परभणीत होतोय राज्यातला पहिला ग्रामीण प्लास्टिक कोटेड रस्ता
२०० दिव्यांगांना व्यवसायासाठी स्कुटर, टॅब
या शिबिरात नोंदणी केलेल्या २०० दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मोटाराईज्ड (इलेक्ट्रॉनिक) स्कुटरचे तसेच अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी ब्रेल टॅबचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉ. राहूल पाटील यांनी दिली.
हेही वाचा- पाथरी विधानसभेसाठी आमदार मोहन फड यांच्या प्रयत्नातून १० कोटींचा निधी
यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ.राहूल पाटील, सह संपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी भोजने, तहसीलदार विद्याचरण कडवकर आदी उपस्थित होते.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES