• A
  • A
  • A
परभणीत होतोय राज्यातला पहिला ग्रामीण प्लास्टिक कोटेड रस्ता

परभणी - रस्त्यांच्या बाबतीत कुप्रसिद्ध असलेल्या परभणी जिल्ह्यात एक आशादायी काम होत आहे. विशेष म्हणजे हे राज्यातील पहिले काम आहे. परभणी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेगाव ते मांगणगाव हा ६ किलोमीटरचा रस्ता ४ कोटी ९८ लाख रुपये खर्चून केला जात आहे. ज्यात जिओ टेक्स्टाईल मटेरिअलच्या (प्लास्टिक कोटेड) चादरचा वापर केला जात आहे.

ग्रामीण प्लास्टिक कोटेड रस्ता


परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेली काळी माती आणि पाण्यामुळे रस्ते वारंवार खचण्याचा प्रकार होत असतो. त्यामुळे वर्षानुवर्षे रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे. मात्र, शासनाला यावर उपाय सुचला आहे. ग्रामीण भागातील रस्ते दीर्घकालीन टिकावेत म्हणून आता जिओ टेक्स्टाईल मटेरियल टाकून रस्ता तयार केला जात आहे. यासाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्यातील पहिला प्रयोग परभणीत करण्यात येत आहे, अशा पद्धतीने रस्ता तयार करण्याची ग्रामीण भागातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

विशेषतः गाव-खेड्यातून शहराला अथवा तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्या नंतरही कायम आहे. आजही अनेक तांड्या, वस्त्यांना जाण्यासाठी रास्ता नाही. हे रस्ते प्रामुख्याने डांबरीकरणाने केली जातात. मात्र, डांबरी रस्ता तयार केल्यानंतर खालच्या काळ्या माती आणि पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो, अनेक ठिकाणी खचला जातो. वारंवार रस्ता करूनही काही दिवसातच ते रस्ते पुन्हा जशास तसेच होतात. मात्र यावर आता शासनाने पर्याय शोधलाय, जे डांबरी रस्ते काळी माती आणि पाण्यामुळे तग धरत नव्हते, ते यापुढे जिओ टेक्स्टाईल मटेरिअल या नवीन तंत्राद्वारे दीर्घकाळ टिकतील, असा दावा करण्यात आला आहे.

परभणी तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा रस्ता मागच्या अनेक वर्ष खराब होता. ज्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करत परभणी गाठावे लागायचे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लातूरच्या आशीर्वाद कन्ट्रक्शनला हे काम देण्यात आले आहे. या ६ किलोमीटरच्या रस्त्याचे काम ४ कोटी ९८ लाख रुपये खर्चून होत आहे. नवीन तंत्राचा वापर करून हे काम करत आहेत. सुरुवातीला रस्त्यावर मुरुमाचा थर टाकून त्याला दबईने दाबून त्यानंतर त्यावर जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरले जात आहे. या मटेरियलवर पुन्हा एका मुरुमाच्या थरानंतर गिट्टीचे दोन थर आणि त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. एकूण ५४ सेंमीपर्यंत जाडीचा हा रस्ता होणार असल्याने, त्यावर एक विशिष्ट प्रकारचा लेअर तयार होतो. जो पाणी रस्त्यावर थांबू देत नाही, शिवाय खालीही पाणी मुरत नसल्याने रस्त्याचे आयुष्य वाढते.

प्लास्टिक कोटेड रस्त्याचे वैशिष्ट्ये -

हा रस्ता प्लास्टिकच्या विविध कचऱ्यापासून तयार केला जातो. तांत्रिक प्रक्रियेत प्लास्टिक कचरा, गिट्टीची चुरी, नायलॉन आणि डांबर असे मिश्रण वापरतात. हवे त्या मापाप्रमाणे याची चादर तयार केली जाते. रस्त्यांच्या मध्यभागी हे वापरल्याने एक वेगळा लेअर तयार होतो. त्यामुळे तो लेयर पाणी थांबू देत नाही आणि खाली मुरुही देत नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, या सोबतच मागील रस्त्यांच्या कामांप्रमाणे याकडे दुर्लक्ष न करता गुणवत्तेकडे लक्ष देण्याची मागणीही नागरिक करत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES