• A
  • A
  • A
पाथरी विधानसभेसाठी आमदार मोहन फड यांच्या प्रयत्नातून १० कोटींचा निधी

परभणी - पाथरी मतदार संघातील विविध मूलभूत आणि विकासात्मक कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी आमदार मोहन फड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ही कामे लवकरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू होणार असल्याची माहिती आमदार फड यांनी दिली.


हेही वाचा-पाथरीत शेतकऱ्यांच्या मदतीला 'मैत्र जिवांचे ग्रुपचा' हात, बंधारा कामाला सुरुवात
पाथरी विधानसभा मतदार संघात पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी ग्रामीण भागाचा समावेश होतो. हा बहुतांश भाग ग्रामीण आणि दुर्गम असल्याने या भागात विकास निधी पोहचला नव्हता. या भागातील लोक पक्के रस्ते, वीज, पाणी, नाल्या, गटार, नळयोजना अशा मूलभूत गरजांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात आमदार फड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे या कामाच्या निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार या चारही भागांच्या मूलभूत कामांसाठी शासनाने ग्रामराज व पंचायत विभागाच्या मार्फत १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.
या निधीतून गावात सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, सभागृह, सौर पथदिवे, आदी कामे सुरू होणार आहेत. यामध्ये परभणी तालुक्यात २ कोटी १० लाख, पाथरीत २ कोटी २५ लाख, मानवत ३ कोटी ५० लाख व सोनपेठ तालुक्यातील कामांवर १ कोटी ८० लाख खर्च केला जाणार आहे. या कामांचे आदेश पारित झाले असून ही कामे जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये होतील, अशीही माहिती मोहन फड यांनी दिली.
हेही वाचा-न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या फरार आरोपीला तब्बल ३१ वर्षानंतर अटक, परभणी पोलिसांची कामगिरीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES