• A
  • A
  • A
पाथरीत शेतकऱ्यांच्या मदतीला 'मैत्र जिवांचे ग्रुपचा' हात, बंधारा कामाला सुरुवात

परभणी - जिल्ह्यातील पाथरी आणि मानवत तालुक्यातील वाघाळा परिसरात कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील दुष्काळी शेतकरी बांधवांना मागील ४ वर्षापासून विविध मार्गाने मदतीचा ओघ सुरू आहे. जन्मभूमी फाउंडेशनच्यामार्फत बंधारा बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा- न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या फरार आरोपीला तब्बल ३१ वर्षानंतर अटक, परभणी पोलिसांची कामगिरी
गेली १० वर्ष मराठवाडा दुष्काचे चटके सोसत आहे. यावर्षी पाथरी तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही वाघाळा परिसरात या वर्षी ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावच्या सीमेवरील जायकवाडी कालव्याचे अतिरीक्त पाणी वाहून जाणा-या सांडव्यावर बांधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी अनिवासी भुमीपुत्र मदत करत आहेत. शनिवारी पुणे स्थित पाथरी तालुक्याचे अभियंते गंगाधर सत्वधर यांच्या "मैत्रजिवांचे" या सामाजिक ग्रुपच्यावतीने या बंधारा कामासाठी १० हजार रुपयांची अर्थिक मदत दिल्याची माहिती जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी दिली.
हेही वाचा- शेतकऱ्यांच्या दुधाचा थेंब वाया जावू देणार नाही - आमदार डॉ. राहुल पाटील
निवासी, अनिवासी, डॉक्टर, अभियंते, उद्योजक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत करत आहेत. तसेच ग्रामस्थांचा लोकवाटा आणि जन्मभूमी फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकांची मदत घेत निधी जमा करण्यात येत आहे. हा बांधारा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या बंधाऱयाच्या कामासाठी आणखी मदतीची गरज असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा- सिंचन विहिरींचे बिले थकली, ७२ शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES