• A
  • A
  • A
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या फरार आरोपीला तब्बल ३१ वर्षानंतर अटक, परभणी पोलिसांची कामगिरी

परभणी - पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल ३१ वर्षांनंतर परभणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. जिल्ह्यातील सेलू येथील ही घटना आहे. आरोपीला १९८९ साली परभणी न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.


हेही वाचा - 'आरएसएस'संदर्भात आराखडा द्या, अन्यथा आघाडी नाही; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला इशारा
छपन्या न्हाकुल्या उर्फ महाकुल्या भोसले , असे या आरोपीचे नाव आहे. त्याने१९८८ साली पत्नीचे बंसय्या आपय्या शिंदे यांच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्यांचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी भोसलेवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन परभणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. त्यानुसार झालेल्या सुनावणीत परभणी न्यायालयाने त्याला१६ मार्च १९८९ ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर तो फरार झाला. तो आपले नाव, अस्तित्व बदलून व वेषांतर करून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळकुटे येथे गेल्या ३२ वर्षांपासून राहू लागला. मात्र, या आरोपीचा शोध घेण्यासाठी परभणी पोलिसांनी विशेष पथक नेमले. या पथकाने आरोपीची विविध ठिकाणी माहिती घेऊन त्याला राहत्या घराजवळ सापळा रचून गुरुवारी पहाटे ४वाजता अटक केली. त्यास सायंकाळी परभणीच्या न्यायालयात हजर करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES