• A
  • A
  • A
शेतकऱ्यांच्या दुधाचा थेंब वाया जावू देणार नाही - आमदार डॉ. राहुल पाटील

परभणी - मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाची कास धरावी. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सर्व दूध शासकीय दूध डेअरीमार्फत खरेदी करण्यात येईल. त्यांच्या दुधाचा थेंबही वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.


हेही वाचा - अमूलने बाजारात आणले उंटीणीचे दूध
शेतकऱ्यांच्या अतिरिक्त दूध खरेदीस पाटील यांनी शासनाची मान्यता मिळवून देत ५ कोटींचे अनुदान प्राप्त करून दिले. यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बुधावरी आमदार राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

परभणी येथील शासकीय दूध डेअरीमार्फत दररोज केवळ २५ हजार लिटर दूध खरेदी करण्याचा आदेश आल्याने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्यास अधिकाऱ्यांमार्फत नकार दिला जात होता. याविषयी आमदार पाटील यांनी मागील आठवड्यात दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या पुढे हा प्रश्‍न मांडून निकाली काढला. त्यामुळे आता दररोज या केंद्रावर ६० हजार लिटर दूध खरेदी केले जात आहे.

हेही वाचा - अधिकाऱ्यांना धारेवर धरताच दूध संकलन पुन्हा सुरू; आमदार डॉ. पाटील...
दरम्यान, या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक सोपानराव अवचार, संदीप झाडे, शहरप्रमुख ज्ञानेश्‍वर पवार, माऊली मोहिते उपस्थित होते.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES