• A
  • A
  • A
सिंचन विहिरींचे बिले थकली, ७२ शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

परभणी - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी २०१७- १८ मध्ये सिंचन विहिरींचे काम पूर्ण करुनही त्यांना बिलासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ९ महिन्यापासून प्रशासनाकडे चकरा मारणारे ७२ शेतकरी वैतागले असून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.


हेही वाचा - दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार; केजरीवाल सरकारची मोठी घोषणा
या संदर्भात पाथरी तालुक्यातील दुष्काळी संकटाचा सामना करणाऱया ७२ शेतकऱ्यांनी एकत्र येत ८ दिवसात बिले द्या, अन्यथा आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. हे निवेदन उपविभागिय अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देखील दिले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१७- १८ या वर्षात विहिरींचे खोदकाम करून बांधकाम पुर्ण केले असुन विहिरीच्या बांधकामाला ९ महिने पूर्ण झाले. दुष्काळात खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम हातचे गेले. या कामासाठी उधारी- उसनवारी करून विहिरींचे बांधकाम केल्याने देणेदारांचा ससेमिरा या शेतक-यांच्या पाठी मागे लागला आहे.

हेही वाचा - पुणतांबा बंद : उपोषणकर्त्या कृषी कन्यांना ग्रामस्थांचा पाठिंबा
या योजनेत तालुक्यातील ७२ शेतकरी पैसे मिळत नसल्याने अक्षरश: वैतागले असून यासाठीच्या कुशल बिलाची रक्कम ८ दिवसात बँक खात्यात जमा करावी, अन्यथा सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकऱयांनी दिला. या दरम्यान ७२ शेतक-यांच्या कुटूंबातील एखाद्या सदस्याने जर आत्महात्या केली तर याला सरकारा जबाबदार राहील, असेही या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर आबासाहेब कोल्हे, आन्सीराम सवने, गंगुबाई भोसले, आसाराम भोसले, मदलसा भोसले, मंडूबाई कोल्हे, गंगाधर जाधव, दत्ता भोसले, अमोल आमले, सुमनबाई आमले, दगडू आमले, आसराबाई डूकरे, नानासाहेब डूकरे, सुभाष गलबे,बन्सीधर शिंदे आदी शेतकऱयांच्या स्वाक्षऱया आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आमदाराचे उपोषण


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES