• A
  • A
  • A
हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून ११ हजार रुपयांना गंडा

परभणी - एटीएम केंद्रामध्ये आलेल्या व्यक्तीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन एका भामट्याने हातचलाखीने कार्डची अदलाबदल करून ११ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. ही घटना पाथरी शहरातील असून पोलीस भामट्याचा शोध घेत आहेत.


पाथरी तालुक्यातील वाघाळा गावचे अनिस अल्लाउद्दीन शेख नविन एटीएमचा कोड घेण्यासाठी पाथरीच्या स्टेट बँक ऑफ इंडियात गेले होते. कोड नंबर मिळविल्यानंतर ते एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले. त्यांना पैसे काढता येत नसल्याचे पाहून एका अनोळखी व्यक्तीने १ हजार रुपये काढून दिले. त्यानंतर त्या भामट्याने एटीएमची अदलाबदल करून तेथून पळ काढला.

हेही वाचा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संस्था - राज्यपाल
काही वेळानंतर अनिस शेख यांना खात्यातून ११ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बँकेत धाव घेत अर्ज केला. तसेच त्यांनी पाथरी पोलिसात धाव घेतली. परंतु, त्यावेळी पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल घेतली नाही, असे शेख यांनी सांगितले. आज मंगळवारी शेख यांनी पुन्हा पाथरी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांकडून एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भामट्याचा शोध सुरू आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES