• A
  • A
  • A
सलाम ! जास्त आलेले २ लाख रुपये बँकेला परत; शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा

परभणी - एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळत आहेत. तर दुसरीकडे बँक कर्मचाऱ्याच्या चुकीने जास्त आलेले तब्बल २ लाख रुपये एका शेतकऱ्याने बँकेला परत केले. ही घटना मंगळवारी पाथरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडली. दीड लाखाचा विड्रॉल भरुन दिल्यानंतर रोखपालाने चुकीने साडेतीन लाखाची रक्कम शेतकऱयाला दिली होती. दरम्यान, शेतकऱ्याच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पाथरी तालूक्यातील कान्सूर गावचे गोकूळ रतनराव शिंदे आणि त्यांचे बंधू धनंजय रतनराव शिंदे हे मंगळवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले. या वेळी गोकूळ यांनी त्यांच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये काढण्यासाठी विड्रॉल स्लीप भरुन दिली. यावेळी बँकेचे रोखपाल उदीत तिवारी यांच्याकडून नजर चूकीने दोन हजाराच्या नोटा एकून साडेतीन लाख रुपये गोकूळ यांना देण्यात आले. परभणी येथे न्यायालयात तारीख असल्याने गडबडीत गोकूळ हे ही रक्कम घेऊन बँकेबाहेर आले.


हेही वाचा -परभणीत उंटाचा हल्ला; मानेवर गंभीर जखम झाल्याने तरुणाचा मृत्यू


काढलेल्या रकमेतील १ लाख रुपये दुसऱया व्यक्तीला द्यावयाचे असल्याने, त्यांनी त्यातून १ लाख रुपये काढले. आणि त्यांना रोखपालने जास्त पैसे दिल्याचे लक्षात आले. त्यांनी कॉ. दिपक लिपने यांना फोनवरून हा प्रकार सांगितला. मला घाई असल्याने परभणीला न्यायालयाच्या कामासाठी जायचे आहे. बँकेचे २ लाख रुपये आगाऊ आलेले तुम्ही परत करा. मी ठेऊन जातो, असा निरोप त्यांनी लिपने यांना दिला.


हेही वाचा - पालम तालुक्यात कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, राहत्या घरातच घेतला गळफास
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कॉ. लिंबाजी कचरे, कॉ. दिपक लिपने, कॉ. शरद कोल्हे, कॉ. दिपक कोल्हे, कल्यान जाधव, पत्रकार किरण घुंबरे पाटील यांच्या उपस्थितीत बँक व्यवस्थापक मंगेश नवसालकर, रोखपाल उदीत तिवारी यांना २ लाख रूपये परत करण्यात आले. बँक व्यवस्थापक आणि रोखपाल यांनी बँकेत पेढे वाटून शिंदे यांचे आभार मानले.

अशा क्वचित घटना घडतात, अशी प्रतिक्रिया बँक कर्मचाऱ्यांनी दिल्या. गोकूळ शिंदे यांचा लवकरच बँकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक नवसालकर यांनी दिली. मात्र, गोकूळ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकतेचे पंचक्रोशीत कौतूक होत आहे. दरम्यान, शेतकरी कितीही अडचणीत असला तरी आपला प्रामाणिकपणा सोडत नाही, याची प्रतिची शिंदे यांनी दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES