• A
  • A
  • A
परभणीच्या उर्सात सापडला फरार चोरटा ; मुद्देमालही झाला हस्तगत

परभणी - दोन वर्षांपूर्वी घरफोडी करून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झालेला आरोपी परभणीच्या उर्सात सापडला आहे. या यात्रेत अनेक आरोपी चोरीचे पैसे उधळण्यासाठी येत असतात, त्यामुळे परभणी पोलिसांचे या यात्रेवर विशेष लक्ष असते.


हेही वाचा-अण्णांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय कृषीमंत्री राळेगणसिद्धीत दाखल
मानवत शहरातील रचना कॉलनीत २०१७ साली या चोरट्याने चोरी केली होती. खयुम रफीक बेग (रा. दर्गारोड, परभणी) असे त्याचे नाव असून तो तेव्हा पासून फरार होता. परभणी शहरात सध्या उर्स यात्रा भरली आहे. या यात्रेत अनेक गुन्हेगार येत असतात. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यान्वीत करण्यात आले आहे. या पथकाला सोमवारी रात्री खयुम रफीक बेग हा उभा असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने तेथे जावून त्यास ताब्यात घेतले.

खयुम रफीक बेगकडून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमाल
त्याची चौकशी केली असता त्याने मानवत शहरातील रचना कॉलनीतील मनियार यांच्या घरी २०१७ मध्ये चोरी केल्याचे कबुल केले. पोलीस पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ तीन ग्रॅम सोन्याची अंगठी, पाच ग्राम वजनाचे कानातील झुंबर व नगदी २६ हजार रूपये सापडले. ते पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मनियार यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. बेग यास मानवत पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या आदेशावरून फौजदार सुनिल गोपीनवार, पोलीस हवालदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारोखी, शंकर गायकवाड, हवालदार संजय शेळके, अरूण कांबळे यांनी केली.
हेही वाचा- तेलतुंबडेंना न्यायालयाचा तुर्तास दिलासा, १२ फेब्रुवारीपर्यंत अटक टळली

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES