• A
  • A
  • A
परभणीत उंटाचा हल्ला; मानेवर गंभीर जखम झाल्याने तरुणाचा मृत्यू

परभणी - येथील उरसा निमित्त काढण्यात येणाऱ्या एका संदलमध्ये सहभागी तरुणावर उंटाने हल्ला केला. उंटाने त्याच्या मानेला जोरदार चावा घेतल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला.

मृत समीर समशोद्दीन


शहरातील तुरबूल हक्क दर्गा परिसरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात उरुस यात्रा भरते. या यात्रेनिमित्त उंटासह संदल (मिरवणूक) काढण्याची प्रथा आहे. मानाच्या संदल मिरवणुकीचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने दर्गा परिसरात रवाना झाली. आझाद कॉर्नरवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या समीर समशोद्दीन या १६ वर्षाच्या तरुणाची उंटाने अचानक मान पकडली. जोरदार चावा घेऊन सोडून दिले. लोकांनी त्याला तत्काळ दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा-अण्णा उपोषणावर ठाम, भामरे आणि महाजनांसोबतची चर्चा निष्फळ
सुमारे १०० ते १२५ वर्षांपासून ही संदल यात्रा काढण्यात येते. मात्र, असा प्रकार कधीही घडला नसल्याचे जाणकार सांगतात. उंट हा अतिशय शांत आणि उंच प्राणी आहे. त्याच्या पाठीवर चादर चढवून त्याला संदलमध्ये सहभागी केले जाते. परंतु, त्याच्याकडून असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा-सेलूच्या मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा; २० लाखाची रोकड पळवली

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES