• A
  • A
  • A
अपघातामुळे नैराश्य आल्याने एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी - अपघातामुळे नैराश्य आलेल्या त्र्यंबक चव्हाण या एसटी चालकाने आज ग्राम पंचायतीच्या बंद पडलेल्या पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील असून हा चालक जिंतूर आगारात कार्यरत होता.


हेही वाचा - सेलूच्या मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा; २० लाखाची रोकड पळवली
चालक त्र्यंबक उर्फ बबन रामचंद्रराव चव्हाण हे मागील आठ वर्षांपासून एस.टी. महामंडळात चालक या पदावर कार्यरत होते. परंतु, मागील वर्षी अहमदनगर येथे झालेल्या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाली. तेव्हापासून त्यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याने ते नैराश्यग्रस्त होते. शनिवारी (२ फेब्रुवारी) सकाळी कामावर जातो म्हणून घरातून निघून गेले, पण ते घरी परतलेच नाहीत. सकाळी चारठाणा फाट्याजवळील ग्रामपंचायतच्या बंद पाण्याच्या टाकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबतीत त्यांचा लहान भाऊ मुकुंद रामचंद्र चव्हाण (रा. चारठाणा) यांनी पोलिसांना माहिती दिली. दिलेल्या माहीतीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबक चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा - रेल्वे पोलिसाने वाचविले वृद्ध जोडप्याचे प्राण; दृष्य सीसीटीव्हीत कैद
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस उपनिरिक्षक रत्नाकर घोळवे, बिट जमादार सूर्यकांत राऊत, पोलीस कॉस्टेबल बळीराम ईगारे, गुलाब भिसे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देवून पंचनामा केला. शवविच्छेदननंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES