• A
  • A
  • A
सेलूच्या मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा; २० लाखाची रोकड पळवली

परभणी - सेलू येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी फोडून दरोडेखोरांनी तब्बल २० लाख रुपयांची रोकड पळवली. ही घटना पहाटे ४ च्या सुमारास घडली असून बँकेला वरिष्ठ पोलिसांसह श्वान पथकाने भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, चोरट्यांनी वापरलेली कार मंठा हद्दीत सापडली असून, लवकरच चोरट्यांचाही सुगावा लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.


परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेलू शाखेत दरोडेखोरांनी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दरवाज्याचे कुलूप तोडून आता प्रवेश केला होता. चोरट्यांनी या गुन्ह्यात एका चारचाकी वाहनाचा वापर केला असून चोरट्यांचा हा कारनामा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यांचा चेहरा कपड्याने झाकलेला होता. ते ३ जण होते. या चोरट्यांनी आधी बँकेच्या मागील भागातून बँकेत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु, दरवाजा तुटत नसल्याने पुन्हा चोरटे मुख्य दाराचे कुलूप तोडून बँकेत शिरले. बँकेतील जवळपास ६ फुटांची तिजोरी आडवी पाडून चोरट्यांनी त्यामधून १९ लाख ८२ हजार १७४ रुपयांची रोकड आणि साडे सात हजार रुपये किमतीचे इंटरनेटचे मोडेम चोरून नेले.
हेही वाचा - बनावट तंबाखूच्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
बँकेचे शाखा व्यवस्थापक भागवत काळे हे सकाळी ८ वाजता बँकेत आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. लगेचच त्यांनी बँकेच्या वरिष्ठांना याबाबत कळवले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक देखील आणले होते. दुपारी शाखा व्यवस्थापक भागवत मारोतराव काळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. दरम्यान, या चोरी प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरविली असून मंठा हद्दीत या चोरीत चोरट्यांनी वापरलेली चारचाकी गाडी सापडली आहे. त्यावरून पोलीस चोरट्यांचा मागोवा घेत आहेत.
हेही वाचा - पालम तालुक्यात कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, राहत्या घरातच घेतला गळफास

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES