• A
  • A
  • A
बनावट तंबाखूच्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी - येथील वांगी रोडवरवरील नामांकित कंपनीची तंबाखू पुडी आणि तोटा बनविणाऱ्या कारखान्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करून पोलिसांनी सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


हेही वाचा-पालम तालुक्यात कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, राहत्या घरातच घेतला गळफास
परभणीच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शहरातील वांगी रोडवर शेख इलियास शेख गफूर हा त्याच्या पत्राच्या शेडमध्ये फास्ट ट्रॅक पॅकर्स प्रा.लि. याच्या व्ही.एच.पटेल कंपनीची गायछाप तंबाखू पुडी आणि सूर्यछाप तोटा तयार करत होता. यासाठी त्याने या कंपनीचे हुबेहूब बनावट लेबल, रॅपर आणि पॅकिंग केली होती. यात निकृष्ट दर्जाची तंबाखू भरून तो या कंपनीच्या नावाने बाजारात विकत होता.
पोलिसांनी अचानक छापा टाकून हा सर्व प्रकार उघडकीस आणला. या ठिकाणी पोलिसांना १ लाख ९२ हजार ३५० रुपयांचा बनावट साठा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करून आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक किशोर नाईक, अनिल हिंगोले, आशा शेल्लाळे, अरुण पांचाळ, शेख ताजोद्दीन, संजय टेकाळे यांनी केली.
महिनाभरपूर्वीच परभणीच्या दुर्गा रोडवर पोलिसांनी बनावट गुटख्याचा कारखाना उध्वस्त केला होता. त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे गुटखामाफीयाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा-पीक कर्जातून थकबाकी वसुलीविरोधात शेतकऱ्यांचा स्टेट बँकेवर मोर्चाCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES