• A
  • A
  • A
पालम तालुक्यात कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, राहत्या घरातच घेतला गळफास

परभणी - सततच्या नापिकीमुळे घरासाठी घेतलेले खाजगी फायनान्सचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत पालम तालुक्यातील सादलापूर येथील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची पालम पोलिसांनी नोंद केली असून शेतकऱ्यावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत शेतकरी भानुदास पांढरे


बालाजी भानुदास पांढरे, असे या 32 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाला कंटाळले होते.

मृत शेतकऱ्यावर महिंद्रा होम फायनान्सचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे, या चिंतेत त्यांनी आपल्या राहत्या घरी काल ३१ जानेवारी रोजी रात्री गळफास घेतला. या बाबत नागनाथ बापूराव जाधव या शेतकऱ्यानी पालम पोलिसात माहिती दिली. या घटनेमुळे सादलापूर येथे हळहळ व्यक्त होत आहे. या शेतकऱ्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

वाचा -
चार-सहा महिन्यात काही झाले तर ठीक, अन्यथा एकत्र येऊन उभारू राम मंदिर - मोहन भागवत
या प्रकरणाची पालम पोलिसात कलम १७४ अन्वय नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राठोड हे करत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES