• A
  • A
  • A
परभणीत ६ लाखांच्या मुद्देमालासह तीन चोर गजाआड

परभणी - रस्त्यात गाडी अडवून तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या आरोपींकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.


हेही वाचा - प्रवाशाला मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाला मनसेकडून चोप

पाथरी शहरातील रहिवासी असलेल्या या आरोपींची नावे संपत गंगाराम गालफाडे, आशिष अनिल ढवळे, विलास उर्फ बंटी चंदर ढवरे अशी आहेत. त्यांनी २ डिसेंबरला पाथरीतील बाबासाहेब वाघमारे यांच्या क्रांती ज्योती इन्फोटेक या दुकानातून १३ क्विंटल सोयाबीन आणि रोख २५ हजार रुपये लंपास केले होते. त्यानंतर याच चोरट्यांनी ७ जानेवारीला पुरुषोत्तम गंगाभिसेन सोमाणी यांना परळी-पाथरी रस्त्यावर अडवून तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील ३ लाख रुपयांची रोकड पळवली होती.
हेही वाचा - साखर जप्तीची कारवाई करा अन्यथा, बेमुदत ठिय्या आंदोलन - स्वाभिमानी शेतकरी संघटना

या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीतून ३ आरोपींचा सुगावा लागल्याने पोलिसांनी पाथरीत सापळा रचून या तिघांना मोठ्या शिताफीने अटक केली. या आरोपींवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव कांबळे करत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES