• A
  • A
  • A
संक्रांतीच्या वाणाला फाटा देत गरजुंना शैक्षणिक मदत, पाथरीतील अनोखा उपक्रम

परभणी - राजकीय व्यक्ती म्हटलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कुठल्याही निमित्ताने भेटून काहीतरी देण्याचा सपाटा सुरू असतो. त्यात संक्रांत आली की विविध प्रकारच्या वाणाच्या वस्तू देऊन मतदार संघातील जास्तीत जास्त लोकांना खुश ठेवण्याची धडपड नेते मंडळी करत असतात. मात्र, याला अपवाद ठरल्या त्या देवनांद्रा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मिरा टेंगसे.


हेही वाचा - जमावबंदीचे आदेश झुगारले; परभणीच्या खासदारांसह ३०० जणांविरुद्ध गुन्हा
टेंगसे यांनी मागील चार वर्षांपासून मकर संक्रातीला वाण देण्यासाठी होणारा खर्च आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा हा उपक्रम चार वर्षांपासून सुरू असून आज गुरूवारी त्यांनी मरडसगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दोन मुलांना वाणाची रक्कम शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी दिली आहे. दरम्यान, २०१६ साली पाथरी तालुक्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास टेंगसे यांनी व त्यांच्या सर्व मैत्रिणींनी ७२ हजार रुपयांची मदत केली होती. तर २०१७ साली पाथरी येथील वसतीगृहास आर्थिक मदत केली आणि २०१८ मध्ये गीता बोराडे या गरीब कुटुंबातील मुलीस उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून तिचे स्वप्न पूर्ण केले होते.

यावर्षी त्यांनी मदत केलेल्या कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा पाथरीच्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोर उपोषण करत असताना हृदय विकाराने मृत्यू झाला होता. या कुटुंबाला मदत करत टेंगसे यांनी महाराष्ट्रातील सर्व महिलांना चांगला आदर्श घालून दिला आहे. दरम्यान, टेंगसे यांच्या अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे त्यांना एका संस्थेने ''क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री रत्न" हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.

हेही वाचा - परभणी लोकसभा मतदारसंघात ५४ हजार मतदार वाढले; ९ हजार वगळलेCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES