• A
  • A
  • A
महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भीषण आग, २० लाखांचे नुकसान

उस्मानाबाद - जिल्ह्यातील तुळजापूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये अचाकन भीषण आग लागली. यामध्ये सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळाले.


हेही वाचा - कोपरगाव कारागृहात न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू
शहरातील कमानवेस वेसजवळ भगवती विहीरीसमोर लोचना चेंबर येथील महाराष्ट्र बँकेतून धुर येऊ लागल्याने सायरन वाजू लागले. लागलीच परिसरातील नागरिकांनी शाखा व्यवस्थापक नंदकुमार कुतवळ यांना कळवले. कुतवळ यांनी तातडीने बँकेत धाव घेतली. मुख्य दरवाजा उघडला. मात्र, भीषण आग आणि धुराचे लोट यामुळे आतमध्ये प्रवेश करणे अशक्य झाले होते. तुळजापूर पालिकेचे अग्नीशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी पाणी कमी पडू लागल्याने खासगी टँकर मागवण्यात आला. त्यानंतर उस्मानाबाद पालिकेचे अग्नीशमन वाहन सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. अखेर ४ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये बँकेतील फर्नीचरसह कॉम्प्युटर, प्रिंटर, अॅटोमॅटीक मशीन आदींचे सुमारे २० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES