• A
  • A
  • A
तुळजापुरात महाराष्ट्र बँकेच्या शाखेत आग, २० लाखांचे नुकसान

उस्मानाबाद - तुळजापूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये आग लागली. या आगीत फर्निचरसह कॉम्प्युटर, प्रिंटर आदींचे सुमारे २० लाख रूपयांचे नुकसान झाले. जवळपास ४ तासाच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली.


हेही वाचा - मलंगगडच्या डोंगरावर भीषण आग; मोठया प्रमाणात वनसंपदा जळून खाक
शहरातील कमानवेस जवळील भगवती विहिरीसमोर लोचना चेंबर येथील महाराष्ट्र बँकेस भीषण आग लागली. बँकेतून धूर येऊ लागल्याना सायरन वाजू लागला. आजूबाजूच्या नागरिकांनी शाखा व्यवस्थापक नंदकुमार कुतवळ यांना याबाबत कळवले. कुतवळ यांनी मुख्य दरवाजा उघडला मात्र आग आणि धुराचे लोट यामुळे आतमध्ये प्रवेश करणे अशक्य झाले होते.
हेही वाचा - कुर्ला बस डेपोत आगीचे रौद्ररूप, ९ वाहने जळून खाक
आगीची माहिती मिळाल्यानंतर तुळजापूर पालिकेचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचले. बँकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्या उचकटून आत प्रवेश केआला. यावेळी पाणी कमी पडल्याने खासगी टँकरही मागवण्यात आले. अधिकच्या मदतीसाठी उस्मानाबाद पालिकेचे अग्निशमन वाहनसुध्दा घटनास्थळी दाखल झाले. अखेर ४ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
हेही वाचा - वाऱ्याच्या झोताने हलणाऱ्या इमारतीच्या खांबामुळे धोका नाही, नागरिकांची...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES