• A
  • A
  • A
चारा छावण्यांअभावी शेतकरी अडचणीत; डोंगरावर होतेय गुरे चराई

उस्मानाबाद - राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा करून १० दिवसांचा कालावधी लोटला तरी या बाबत कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी अडचणीत आला असून जनावरांना चारा मिळत नसल्याने जनावरे चरण्यासाठी डोंगरावर जावे लागत आहे.


सध्या मराठवाड्यासह जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. माणसाच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा तसा डोंगराळ भागाचा आहे. पाऊस नसल्यामुळे शेत-शिवार ओसाड पडली आहेत. सध्या जनावरांना डोंगरावर नेऊन चारा खाऊ घालावा लागत आहे. चारा पूर्ण वाळून गेला असला तरी पर्याय नसल्याने हाच चारा जनावरांना चारावा लागत आहे.
हेही वाचा -तरुणांचा अनोखा उपक्रम, दुष्काळात पक्षांसाठी केली अन्न, पाण्याची सोय
राज्य शासनाने चारा छावण्या लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप लोकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. राज्यशासनाने या अगोदर मराठवाडयात काही जिल्ह्यात गोशाळा, गोसवंर्धनाच्या नावाखाली जिल्ह्यात एक चारा छावणी सुरू केली आहे. मात्र, त्या छावणीवर जिल्ह्यातील संपूर्ण जनावरे जगू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने चारा छावण्या सुरू करून मुक्या जीवांसह शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा- कदम कुटुंबीयांचा अनोखा छंद, २०० वर्ष जुन्या तांबा पितळेच्या भांड्यांची मांडली आरास

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES