• A
  • A
  • A
तरुणांचा अनोखा उपक्रम, दुष्काळात पक्षांसाठी केली अन्न, पाण्याची सोय

उस्मानाबाद - मराठवाड्याला दुष्काळ तसा नवा नाही, सध्या उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे मराठवाड्यात दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू झाले आहे. या दुष्काळाचा फटका माणसांपेक्षा जास्त पक्ष्यांना बसत आहे.


जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्यावाचून पक्ष्यांची तडफड सुरू होत आहे. यामुळे भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील तरुणांनी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्हा बँकेने सुरू केले महाराष्ट्रातील पहिले फिरते एटीएम
रोहन खामकर आणि बाजीराव कानडे या तरुणांनी शेतातील झाडांवर १९० प्लास्टिकच्या बाटल्या बांधल्या असून, पाण्याने भरलेल्या या बाटल्यांमुळे पक्ष्यांची सोय झाली आहे. पक्षांसाठी अन्न म्हणून ज्वारीचे कणीस, धान्यही याच झाडाला बांधून ठेवले आहे. यामुळे दुष्काळात पक्ष्यांची तहान आणि भूक भागण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा - ईनाडू इम्पॅक्ट : समाज कल्याण सभापतींच्या सरकारी वाहनाच्या काळ्या काचा हटवल्या
पाण्याचे स्त्रोत आटल्याने व दुष्काळाने शेतात पिके नसल्याने अन्न पाण्याच्या शोघात पक्षी दूरवर भटकंती करू लागल्याने सुगरणीसह इतर पक्षांची घरटी ओसाड पडत आहेत. दरवर्षी जानेवारीत शेतात असलेला पक्ष्यांचा किलबिलाट दुष्काळाने शांत झाला आहे. ही स्थिती ओळखून रोहन खामकर व बाजीराव कानडे यानी झाडांवर पाण्याच्या बाटल्या व अन्न बांधून पक्ष्यांना दुष्काळात आधार दिला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES