कदम कुटुंबीयांचा अनोखा छंद, २०० वर्ष जुन्या तांबा पितळेच्या भांड्यांची मांडली आरास
उस्मानाबाद - येथील प्रा. सतीश कदम आणि त्यांचा मुलगा सूरज कदम यांनी मकर संक्रांतीच्या निमित्त जुन्या तांबे आणि पितळी भांड्यांचा संग्रह केला आहे. या संग्रहाची त्यांनी हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त आरास मांडली आहे. यामध्ये २०० वर्षापर्यंत जुन्या भांड्यांचा समावेश आहे.
सतीश कदम इतिहास तज्ज्ञ आहेत. निजामकालीन इतिहासासंबंधी त्यांना भरपूर माहीती आहे. तर सूरज यांना जुने नाणी, भांडी पुरातन वस्तू जमवण्याचा छंद आहे. त्यामुळे या कदम कुटुंबाने जुण्या तांबे-पितळी भांड्यांचा संग्रह उभा केला आहे. या तांब्या-पितळेचे भांडे १०० ते २०० वर्ष पूर्वीचा इतिहास सांगतात. पूर्वी वापरात असलेले धान्य मोजायचे शेर, चिपटे, आटवा, कोळव, निळव, चिळव अशा वेगवेगळ्या नक्षीदार भांड्यांचा समावेश त्यांच्या संग्रहात आहे.
हेही वाचा - शासनाची मदत देताना सक्तीची सारा वसुली तत्काळ थांबवावी, शिवसेनेची मागणी वेगवेगळ्या आकाराचे पान पुढे ब्रिटीश कालीन गाडीच्या आकाराचा पानपुडा, सुपारी कातरायचे आडकित्ते, मसाले ठेवायचे डब्बे, ताट-वाटी, पिठ ठेवायचे डब्बे, वरण पळी, चमचे, उलतणे, पितळी घागर, पितळी हंडा, ईडली पात्र, जनावरांच्या गळ्यात बांधायच्या वेगवेगळ्या घंटा, कुंकवाचे करंडे, कडची, नक्षीकाम केलेले छोटे-छोटे रॅक अशी अनेक तांब्या पितळेची जुणी पुराणी भांडी कदम कुटुंबीयांकडे पहायला मिळतात. संक्रातीच्या हळदी- कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी प्रदर्शन भरवले आहे. इथे येणाऱ्या सर्वांना या भांड्यांची माहीती व्हावी, यासाठी त्यांनी याची आरास मांडली आहे.