• A
  • A
  • A
उस्मानाबाद जिल्हा बँकेने सुरू केले महाराष्ट्रातील पहिले फिरते एटीएम

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. बँकेने महाराष्ट्रातील पहिली फिरती एटीएम व्हॅन सुरू केली आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील गावोगावी जाऊन बँकिंग सेवा देणार आहे. त्यामुळे बँक शाखेपासून दुर खेडोपाडी राहणाऱ्या निरक्षर, वृद्ध लोकांना आर्थिक सेवांचा लाभ मिळणार आहे.


ही सेवा निराधार व्यक्तींचा बँकेत होणारा पगार, शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान, विमा अशाच खातेदारांना या फिरत्या मोबाईल एटीएमचा उपभोग घेता येणार आहे. मात्र, ही सेवा या बँकेत जुन्या ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना होणार नाही. बँकेने नाबार्डच्या सहकार्याने या फिरत्या एटीएम व्हॅनची सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन हे फिरते एटीएम सेवा पुरविणार असल्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे.

वाचा-लग्नाच्या ८ दिवस अगोदरच तरुणीवर काळाचा घाला; केळवण करून परतताना अपघात
रोखे घोटाळे, विनातारण कर्जवाटपासह थकीत कर्जवसुलीमुळे जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आली आहे. ठेवीदार पैशांसाठी बँकेत येतात मात्र, वेळेवर पैसे मिळत नाहीत. तसेच जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांची कोट्यावधी रुपयांची वसुली थकली आहे. त्यामुळे बँकेची प्रतिमा मलीन झाली आहे.

वाचा- अण्णा हजारेंचे उपोषण ७ व्या दिवशी मागे, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES