• A
  • A
  • A
हा तर भाजपचा स्वबळाचा इशारा; सेनेला गृहीत न धरता प्रचाराची सुरुवात

उस्मानाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'भारत के मन की बात, मोदी के साथ' या कार्यक्रमाची जोरदार तयारी उस्मानाबाद येथे सुरू आहे. औरंगाबाद-सोलापूर बायपास मार्गावरती मालवाहू चारचाकी गाड्यांना पोस्टर्स आणि एल.ई.डी. स्क्रिन बसवण्याचे काम जोरात चालू आहे. या गाड्यांची सजावट झाल्यानंतर मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन केले जाणार आहे.


हेही वाचा - शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना गावकऱ्यांशी वाद नडला, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

उद्घाटनानंतर या गाड्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात या गाड्या फिरविण्यात येणार आहेत. या गाड्यावरती लावण्यात आलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून प्रधानमंत्री कार्यालयातून अधिकारी लोकांशी थेट संवाद साधता येणार आहे. तब्बल ९० दिवस या गाड्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात फिरणार असून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती यामार्फत देण्यात येणार आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात २५ गाड्याची तयारी पूर्ण झाली आहे, तर सांगलीत ७ गाड्याची काम करण्यात आल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात १८ गाड्याचे डिजिटल स्क्रिन बसून सजावट केली जाणार आहे. अशा एकून ५० गाड्यांना, अशी डिजिटल स्क्रिन बसवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.

हेही वाचा - आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, न्यायालयाच्या सुटकेच्या आदेशाने पुणे पोलिसांना दणका

भाजपच्या लोकसभेच्या प्रचारासाठी या गाड्या वापरण्यात येणार असून प्रत्येक भाजपच्या खासदारकीच्या उमेदवाराकडे एक गाडी पाठवण्यात येणार आहे. येत्या ९० दिवसात या गाड्या संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. या जाहीरात गाडीसाठी दर दिवशी एक हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. या प्रत्येक गाडीला जवळपास 2 ते 3 लाख रूपयांचा खर्च केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES