• A
  • A
  • A
शासनाची मदत देताना सक्तीची सारा वसुली तत्काळ थांबवावी, शिवसेनेची मागणी

उस्मानाबाद - राज्य शासनाकडून आलेली मदत शेतकऱ्याकडून सुरू असलेली सक्तीची सारा वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी जिल्हा शिवसेनेने केली आहे. शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे जमा करण्याचे काम करताना तलाठ्यांमार्फत सक्तीने सारा वसुली केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


हेही वाचा - ईनाडू इम्पॅक्ट : समाज कल्याण सभापतींच्या सरकारी वाहनाच्या काळ्या काचा हटवल्या
जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. शासनाच्यावतीने थोडीफार आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही कागदपत्रे जमा करत असताना काही तलाठ्यांकडून सक्तीने सारा वसुलीही करण्यात येत आहे.

हेही वाचा - लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षाची शिक्षा
वास्तविक शासनाने संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी जिल्हा शिवसेनेने आज लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिश सोमानी, शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, नगरसेवक सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, नितीन शेरखाने, सोमनाथ गुरव, अनंत भक्ते, गुणवंत देशमुख, भिमा जाधव, आण्णासाहेब पवार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा - दुष्काळी भागात कोट्यवधी रुपयांची दारू जप्तCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES