• A
  • A
  • A
ईनाडू इम्पॅक्ट : समाज कल्याण सभापतींच्या सरकारी वाहनाच्या काळ्या काचा हटवल्या

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती चंद्रकला भीमराव नारायणकर यांच्या सरकारी वाहनाच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्याच वाहनांच्या काचा काळ्या असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त ईनाडू इंडियाने प्रसारित केले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभापतींच्या गाडीच्या काळा काचा हटवण्याची कारवाई केली आहे.


चंद्रकला नारायणकर या समाज कल्याण विभागाच्या सभापती असल्याने त्यांच्याकडे प्रवासासाठी महाराष्ट्र शासनाची गाडी (एम.एच. २५ सी ६५२३) आहे. या वाहनाच्या काचा काळ्या फिल्म (गॉगल ग्लास) लावण्यात आल्याने पारदर्शी नाहीत. वाहतुकीच्या नियमानुसार तो गुन्हा आहे.
समाज कल्याण सभापती महोदयांकडून वाहतूक नियमांना धाब्यावर बसविण्यात येत होते. त्यामुळे याबाबत ईनाडूने 'खुद्द सभापती महोदयांच्या सरकारी वाहनाची काच काळी; कारवाई कोण करणार?' अशी बातमी प्रसारित केली होती, या बातमीची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी गजानन नेरपगार यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रादेशिक विभागाकडून सभापती महोदयांना काळी काच हटवण्याची तोंडी समज देण्यात आली. यावर सभापतींच्या शासकीय वाहनाच्या काळ्या काचा हटविण्यात आल्या.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES