• A
  • A
  • A
लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षाची शिक्षा

उस्मानाबाद - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी अमोल नामदेव अंकुशराव याला जिल्हा सत्र न्यायालयाकडून २० वर्षाची सुक्तमजुरीची शिक्षा व १८ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपीने पीडितेच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले होते.


मुलीचे शोषण केल्यानंतर आरोपी अमोल तिच्या घराजवळ गेला होता. त्यावेळी पीडित मुलगी त्याला घाबरून आईच्या पाठीमागे लपली. पीडितेच्या आईने या संदर्भात मुलीस विचारणा केल्यानंतर घडलेल्या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर पीडितेच्या आईने उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात २० नोव्हेंबर २०१७ला आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली. तक्रारीवरुन आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अपराध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - प्रा. वरवरा रावसह सुरेंद्र गडलिंग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात, ११ दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयात या प्रकरणी एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडीत मुलीची (वय ५ वर्ष) साक्ष महत्वपूर्ण ठरली. आरोपी अमोलला न्यायालयाकडून २० वर्षाची सुक्तमजुरीची शिक्षा व १८ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES