• A
  • A
  • A
दुष्काळी भागात कोट्यवधी रुपयांची दारू जप्त

उस्मानाबाद - जिल्हा जरी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला तरी येथे घडणाऱ्या गुन्ह्यांचे आणि गुन्हा संबधी होणाऱ्या कारवाईंच्या संख्याचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात गुटखा, जुगार, वाळू तस्करी, चोरी, अवैधरीत्या चालणारे व्यवसाय, खून, तसेच बलात्कार आणि हद्दपार लोकांची संख्या देखील वाढली आहे. त्याबरोबरच पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांवर होणाऱ्या कारवाईचे प्रमाणही वाढले आहे.


हेही वाचा-'दारूबंदी' प्रकरणी लोहारा पोलिसांची निष्क्रियता पुन्हा चव्हाट्यावर
जिल्ह्यात अवैद्य दारू संदर्भात केलेली कारवाई खूप मोठी आहे. दारूबंदीचे एकूण १ हजार २७ गुन्हे नोंद झाले असून १ हजार ९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या आरोपींकडून तब्बल १ कोटी ५ लाख १ हजार ५२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैद्य गुटखा विक्रीच्या संबंधात झालेल्या कारवाईची संख्यादेखील जास्त आहे. यामध्ये तब्बल २० लाख ७८ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाळू तस्करांकडून १० लाख ९५ हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१७ मध्ये ८ लाख ४९ हजार ५०० रुपयांपर्यंतच ही कारवाई करण्यात आली होती. त्याबरोबरच २०१८ मध्ये जिल्ह्यातील आरोपीविरुद्ध दोष सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये २२ टक्के आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. हेच प्रमाण २०१७ मध्ये फक्त १३ टक्क्यांवर होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे काही प्रमाणात का होईना गुन्हेगारांवर वचक बसला आहे.
हेही वाचा-उस्मानाबाद येथे ठिकठिकाणी जुगार अड्ड्यावर छापेCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES