• A
  • A
  • A
'दारूबंदी' प्रकरणी लोहारा पोलिसांची निष्क्रियता पुन्हा चव्हाट्यावर

उस्मानाबाद - पोलिसांच्या निष्क्रियतेला वैतागून लोहारा तालुक्यातील होळीमधील ७० ते ८० महिला ग्रामस्थांनी दारूबंदीसाठी तहसील कार्यालयात २ तास ठिय्या आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी लोहारा तालुक्यातील नागुर या गावातील महिलांनी देखील असेच तहसील कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केले होते.


हेही वाचा -उस्मानाबाद येथे ठिकठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे
त्यानंतर ३० जानेवारी रोजी होळी या गावातील लोकांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. होळी येथे अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री होत आहे. त्यात हातभट्टी, देशी, विदेशी अशा सर्व प्रकारची दारू विकली जाते. या अवैध दारूमुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. या अवैद्य धंद्याकडे कोणीच लक्ष देत नाही असा नागरिकांचा आरोप आहे. पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही, म्हणून गावातील सरपंचांसह गावातील नागरिक महिलांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. या वेळी तहसीलदार यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा -उस्मानाबादमध्ये कळंब पत्रकार संघ आणि गिताई प्रतिष्ठानतर्फे बारावीच्या मुलींकरता मोफत अभ्यासिका
होळी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन आणि संबंधित उत्पादन शुल्क विभाग यांना तात्काळ कारवाई करून दारू विकणाऱ्याला अटक करावी, या मागणीचे निवेदन बुधवारी लोहारा तहसीलदार राहुल पाटील आणि पोलिसांना दिले होते. दिलेल्या निवेदनावर सरपंच व्यंकट माळी, देवता सरवदे, छाया वचने, महरून शेख, शोभा मोरे आदी २५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES