• A
  • A
  • A
बायकोने रॉकेल ओतून घेतले,नवऱ्याने पेटवून दिले; उस्मानाबादमधील धक्कादायक प्रकार

उस्मानाबाद - चारित्र्याच्या संशयावरून निर्माण झालेल्या भांडणात पत्नीने अंगावर रॉकेल ओतून घेतले. तर तिच्या पतीने चक्क काडीपेटीतून काडी ओढून पेटवून दिल्याचा प्रकार तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी येथे घडला. याप्रकरणी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी घडला.


पारप्पा विश्वनाथ बरवे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. त्यामुळे दोघात सतत वाद होत होते. रविवार त्यांच्यात जोरदार वाद झाला. यामध्ये पत्नीने घरातील एका प्लास्टिक कॅनमधील रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले.

हेही वाचा - बीड नगरपालिकेला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा विसर

त्यावेळी पत्नीला पेटवून घेण्यापासून परावृत्त करण्याऐवजी पारप्पा बरवे याने त्याच्या खिश्यातील काडीपेटी ओढून पेटवून दिले. जवळच्या नातेवाईकांनी पत्नीला सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून बरवे याच्यावर पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES