• A
  • A
  • A
उस्मानाबादमध्ये कळंब पत्रकार संघ आणि गिताई प्रतिष्ठानतर्फे बारावीच्या मुलींकरता मोफत अभ्यासिका

उस्मानाबाद - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक मुलींचे शिक्षण बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी गिताई प्रतिष्ठान (माळी नगर) आणि कळंब तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयीन १२ वीच्या विविध शाखेतील मुलींचे मोफत वर्ग १० जानेवारी पासून चालू करण्यात आले आहेत.


हेही वाचा -सरपंचांनीच प्रजासत्ताक दिनी दिल्या गावकऱ्यांना शिव्या
यामध्ये एक वर्ष मोफत वर्ग घेण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यातील मुलींच्या शिक्षणाला मदतीचा हात दिला आहे. पाऊस येईल या विश्वासाने कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली होती. ज्या काळात पिके शेतात डोलत होती. त्या काळात पिके पाण्याविना वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. याचा परिणाम आता शेतकऱ्यांच्या मुलांवर होत आहे. अनेक मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच दुष्काळ आणि त्यात आर्थिक चणचण यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यासासाठी शिकवणी लावणे ही दूरची गोष्ट झाली आहे.

याबाबत विचार करून आणि मराठवाड्याला मदतीचा हात म्हणून माळीनगर येथील गिताई प्रतिष्ठान आणि कळंब तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने १२ वी च्या महाविद्यालयीन मुलींना मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन 'यु व्ही सायन्स अॅकेडमी' आणि 'ज्ञानज्योती क्लासेस' येथे करण्यात आले आहे.
हेही वाचा -जिल्ह्यातील साठवण तलावात अत्यल्प पाणीसाठा
यामध्ये प्रवेश घेण्याकरता प्रा. ए. के रोडे, प्रा. डी. पी. कलढोणे, प्रा. वाय.आर.कापसे (मो. क्र. ७०२००९८७०९), प्रा. प्रविन जाधव ( मो. क्रं ८३०८०९४००४) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन सतीश टोणगे आणि शितलकुमार घोंगडे यांनी केले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES